वार्ताहर/ तवंदी
पोलीस असल्याची बतावणी करून भामटय़ांनी शिरगुप्पी (ता. निपाणी) येथील शंकर जानबा सातवेकर (वय 65) या वृद्धाच्या हातातील दोन तोळय़ाच्या तीन अंगठय़ा हातोहात लांबविल्या. ही घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास निपाणी-शिरगुप्पी रस्त्यावर घडली.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, शंकर सातवेकर हे दररोज फिरण्यासाठी शिरगुप्पी-निपाणी रस्त्यावर जातात. नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ते फिरायला गेले होते. यावेळी ते रस्त्याकडेला असणाऱया बाकडय़ावर बसले असताना तेथे दोन भामटे आले. त्यांनी सातवेकर यांना येथे जवळपास खून झाला असून आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी केली. तसेच तुम्ही असे एकटे अंगावर सोने घालून बसू नका, हातातील अंगठय़ा काढून ठेवा, असे सांगितले. तसेच बोलत असतानाच त्या अंगठय़ा काढून घेतल्या आणि ते निपाणीच्या दिशेने पसार झाले. शंकर यांना स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील काही नागरिकांना याची माहिती दिली. सातवेकर यांनी सायंकाळी सातच्या सुमारास निपाणी शहर पोलीस ठाण्यात सदरची फिर्याद दाखल केली आहे.