प्रत्येक घराला 400 युनिट वीज मोफत : 1 लाख शासकीय नोकऱया, न्यू चंदीगडमध्ये फिल्म सिटी
शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी पंजाबमध्ये अकाली दल आणि बसप आघाडीचे घोषणापत्र जारी केले आहे. यात प्रत्येक घराला 400 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन महत्त्वाचे आहे. याचबरोबर पंजाबमध्ये फ्लाइंग अकॅडमी आणि रेसकोर्स निर्माण करण्यात येतील. 5 वर्षांमध्ये एक लाख शासकीय नोकऱया देण्यात येतील. परवानाराज संपुष्टात आणली जाईल तसेच न्यू चंदीगडमध्ये फिल्मसिटी निर्माण करण्याचे आश्वासन आघाडीकडून देण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे राजकीय पक्ष घोषणापत्रावर अंमलबजावणी करत नाहीत. परंतु अकाली दल हे लागू करणार आहे. काँग्रेसने यापूर्वी शपथा घेऊन दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचे सुखबीर म्हणाले.
अकाली-बसप आघाडीच्या घोषणा..
कल्याणकारी योजना.
पेन्शन 1500 वरून वाढवत 3100 रुपये करण्यात येणार
गरीब मुलीच्या विवाहासाठी शगन योजनेची रक्कम 75 हजार करणार
गरीबांसाठी 5 वर्षांमध्ये 5 लाख घरांची निर्मिती करणार
भाई घन्हैया योजनेंतर्गत 2 लाखांची वैद्यकीय विमा योजना पुन्हा सुरू करणार
स्टुडंट कार्ड योजना सुरू करणार, प्रवेश घेतल्यावर 10 लाखांपर्यंतची मदत
शिक्षण
दर 25 हजार लोकसंख्येत 5 हजार मुलांचे मेगा स्कुल निर्माण होणार
प्रत्येक मतदारसंघात 10-12 शाळा निर्माण केल्या जातील.
महाविद्यालयांमध्ये 33 टक्के जागा सरकारी शाळेत शिकलेल्या मुलांसाठी राखीव
पंजाबमध्ये 6 विद्यापीठे स्थान करणार, 3-4 फ्लाइंग अकॅडमी सुरू करणार
पंजाबमध्ये 2 नवी मंत्रालये
फॉरेन एम्प्लॉयमेंट अँड एज्युकेशन मिनिस्ट्री निर्माण करू. दूतावास आणि कंपन्यांशी ताळमेळ साधून पंजाबींना विदेशात नोकरी मिळवून देण्याचे काम करू. कंपन्यांची पडताळणी केली जाईल. स्टुडंट कार्ड योजना तेथे प्रवेशासाठीही लागू होणार आहे. कंट्री एरिया डेव्हलपमेंट मंत्रालय स्थापन करू. याच्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणार
वीज
प्रत्येक घराला 400 युनिट मोफत वीज मिळणार.
अवजड उद्योगांना सौरप्रकल्पासाठी प्रोत्साहन देणार
वीज विभागाला दिले जाणार अनुदान 2 वर्षांत संपविणार
व्यापाऱयांसाठी…
लघू आणि मध्यम उद्योगांना प्रत्येकी 10 लाखांच विमा
25 लाखाची उलाढाल असणाऱयांना हिशेबपुस्तके बाळगणे अनिवार्य नसेल
10 लाखापर्यंत कर्ज घेणाऱयांना 5 टक्के अनुदान देण्यात येणार
अन्य आश्वासने..
ट्रक युनियन बहाल केली जाणार, परंतु एसडीएम अंतर्गत समिती स्थापन केली जाईल. ज्यात ट्रक युनियन प्रमुख आणि व्यापाऱयांचे प्रतिनिधी असतील. ही समिती दर निश्चित करणार आहे.
अंगणवाडी कर्मचाऱयांना प्री-नर्सरीचा दर्जा देण्यात येणार
आशा कार्यकर्त्यांचे मानधन वाढविणार
करालगढ येथील पवित्र स्थानाचा विकास करणार
ऑलिम्पिककरता खेळाडूंना प्रोत्साहन देणार
पंजाबमध्ये ख्रिश्चन अन् मुस्लीम कल्याण महामंडळ
माफियाराज संपविण्यासाठी मद्य तसेच वाळूचे महामंडळ स्थापन करणार