प्रतिनिधी / शिरोळ
राज्यभर मराठा समाजाच्या आरक्षण निर्णयावरुन निषेध केला जात असतानाच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारी कार्यक्रमांना शिरोळ तालुक्यात बंदी घालण्यात आली आहे. तसेच खासदार आमदार मंत्री अन्य कोणी सरकारी कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास मराठा समाजाच्यावतीने उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी दिला.
शिरोळ सकल मराठा समाज यांच्यावतीने शिवाजी चौकातून मोर्चा काढण्यात आला पंचायत समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले, यावेळी बोलताना धनाजी चुडमूगे म्हणाले की मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील अनेक तरुणांना विविध शासकीय सवलती ना मुकावे लागणार आहे.
शासनाने जोपर्यंत मराठा आरक्षण देत नाही तोपर्यंत आपत्तकालीन बाबी वगळता तालुक्यात कोणतेही शासकीय कार्यक्रम होऊ देणार नाही मंत्री, आमदार, खासदार, यांच्या सर्व कार्यक्रमांना विरोध करून हाणून पाडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शासनाचा जाहीर निषेधही यावेळी करण्यात आला मराठा समाजातील तरुण सहभागी झाले होते. यावेळी पीएसआय नवनाथ सुळ यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.