शिरोळ/प्रतिनिधी
पंचायत समितीच्या सभापती मिनाज जमादार आपल्या पदाचा राजीनामा गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे सादर करणार आहेत.
मिनाज जमादार यांची 30 डिसेंबर रोजी सभापतीपदी निवड करण्यात आली होती आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे पाच महिन्याचा कार्यकाळ देण्यात आला होता पाच महिने उलटून गेले तरी आपल्या पदाचा राजीनामा न दिल्याने 13 पैकी 12 सदस्य आघाडीचे नेते गणपतराव पाटील राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे साकडे घातले होते श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली यामध्ये येत्या गुरुवारी जमादार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला.
बैठकीस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे जिप माजी जि प सदस्य माधवराव धनवडे पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे सौ अर्चना चौगुले सौ कविता चौगुले भागवत यांच्यासह अन्य कार्यकर्तेउपस्थित होते राष्ट्रवादीच्या दिपाली परीट त्यांची सभापतीपदी शिवसेनेचे वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.