लेझीम, घोडेस्वारसह मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके : शोभायात्रेत शिवकालीन युद्धकला पाहण्यासाठी शिवभक्तांची गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाववतीने दरवषीप्रमाणे यावषी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1944 या हिंदू तिथीनुसार मोठय़ा जल्लोषात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. मागील दोन वर्षात कोरोनामुळे हा सोहळा झाला नव्हता. यावषी उत्साही वातावरणात टाळ-मृदंगाच्या गजरात, लेझीमच्या निनादात, घोडेस्वाराच्या साथीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत दुग्धाभिषेक, जलाभिषेक घालण्यात आला. बेळगावमधील उद्योजक शिरीष गोगटे व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. शिवरायांच्या मूर्तीला फुलांची नयनरम्य आरास करण्यात आली होती. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेऊन ही आरास केली होती.
आरती झाल्यानंतर देवदर्शन यात्रेला सुरुवात झाली. शिरीष गोगटे व कीर्तनकार हभप बाळू भक्तीकर महाराज यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. दीपक पवार यांनी ध्वजाचे पूजन केले. वारकरी सांप्रदायाच्यावतीने पालखीतील शिवरायांची मूर्ती तसेच शिवचरित्र ग्रंथाचे पूजन करण्यात आले. यानंतर देवदर्शन यात्रेला सुरुवात झाली.
वारकऱयांची अखंड भजनसेवा
छत्रपती शिवाजी उद्यान ते कपिलेश्वर मंदिरपर्यंत देवदर्शन यात्रा काढण्यात आली. देवदर्शन यात्रेत प्रारंभी ध्वजपथक, त्यानंतर रत्नप्रसाद पवार यांचे अश्वपथक, त्यानंतर कणबर्गी, होनगा येथील लेझीम पथक सहभागी झाले होते. सावगाव येथील वारकऱयांनी अखंड भजन
सेवा केली.
या शोभायात्रेत लाठी-काठी, दांडपट्टा अशा मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. मिरवणुकीत शिवकालीन युद्धकला पाहण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. भगवे फेटे बांधून धारकरी यामध्ये सहभागी झाले होते. कपिलेश्वर मंदिरात देवदर्शन यात्रेची सांगता झाली. प्रमिला पाटील, नेहा मोरे यांच्या हस्ते कपिलेश्वर मंदिरात आरती करण्यात आली.
तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील यांनी शिवराज्याभिषेक दिन हिंदू तिथीनुसारच साजरा केला पाहिजे, असे सांगून मार्गदर्शन केले. ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित शिवभक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी अजित जाधव, पुंडलिक चव्हाण, परशराम कोकितकर, आनंद चौगुले, किरण बडवाण्णाचे, अंकुश केसरकर, गजानन निलजकर, हिरामणी मुचंडीकर, प्रवीण मुरारी, विजय कुंटे, प्रफुल्ल शिरवलकर यासह विभागप्रमुख व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.