दोडामार्ग / वार्ताहर:
शिवशंभू प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष पदी तुषार देसाई तर दोडामार्ग तालुकाध्यक्ष पदी प्रविण गवस यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात देव, देश व धर्म या संकल्पनेतून स्थापन झालेल्या आणि जोमाने कार्यरत असलेल्या शिवशंभू प्रतिष्ठानची बैठक शनिवारी साटेली-भेडशी येथील वनविभाग शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष जय भोसले यांनी या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात व्यक्त नावांची घोषणा केली.
यावेळी प्रविण गवस, भैय्या पांगम, गोविंद शिरसाठ, विजय कांबळे, सूर्याजी झेंडे, पंकज गवस, अनिल कांबळे, अमित गवस, विशाल गवस, हेमंत कांबळे, संतोष कांबळे, आकाश चारी आदी सदस्य उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. संस्थेमार्फत लवकरच भव्य रक्तदान शिबीर व उपक्रम राबविले जातील.