प्रतिनिधी/ सातारा
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेशानुसार आता घराघरात शिवसैनिक निर्माण करण्याचे ध्येय घेऊन शिवसेना सातारा जिल्हा पाऊले उचलत आहे. याचाच एक भाग म्हणून आज साताऱयात प्रतिभाताई शेलार, उपशहर संघटिका यांचा माध्यमातून महिलांसाठी पाहिले संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे यांचा हस्ते पार पडले.
काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांनी जिह्याचा दौरा करून शिवसेना अधिक मजबूत करण्याचा घराघरात शिवसेना पोहचविण्याचा सूचना केल्या होत्या. आज साताऱयात सातारा शहर शिवसेना संघटिका प्रतिभाताई शेलार यांनी महिलांचे प्रश्न आणि जास्तीत जास्त महिलांना शिवसेनेशी जोडण्यासाठी संपर्क कार्यालय सुरू केले. या कार्यालयाचा माध्यमातून महिलांचा प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम या कार्यालयातून होणार आहे. शहरात शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे यावेळी बोलताना प्रतिभाताई शेलार यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे उपस्थित होते. तसेच जिल्हा संघटिका शारदाताई जाधव, उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते, तालुका प्रमुख अनिल गुजर, अतिष ननावरे, विश्वनाथ धनावडे, शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, निलेश मोरे, सचिन जवळ, प्रणव सावंत, शहर संघटक रूपालिताई लेंबे, मंजरीताई सावंत, अमर मोहिते, नारायण निकम, हणमंत भिलारे यांचासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.