हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांचा खळबळजनक आरोप
प्रतिनिधी/सातारा
खासदार उदयनराजे भोसले यांनी शहरातील फेरीवाल्यांना पालिकेच्यावतीने एक हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्या अगोदर आमदार शिवेंद्रराजेंनी शहरातील फेरीवाल्यांची वाटोळे केले असा आरोप केला होता. आता शहरातील हॉकर्स संघटनचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी पत्रक काढून खासदार उदयनराजेंचे शतशः आभार, त्यांनी असेच काम करावे. बारीक सारीक टीकाखोरांकडे लक्ष देवू नका असा सल्ला दिला आहे. त्यामुळे आमदार शिवेंद्रराजे यांच्या हॉकर्स संघटनेकडून त्यांवर उत्तर काय येणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
साताऱयात फेरीवाल्यांना एक हजार रुपये देण्याची खासदार उदयनराजेंनी घोषणा केली. त्यावर खासदार खासदार उदयनराजे समर्थक असलेल्या हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी रविवार पत्रक काढले आहे. त्या पत्रकात म्हटले आहे, की राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येकी फेरीवाल्यास पंधाराशे रुपये मदत जाहीर केली आहे. खासदार उदयनराजे भोसले नगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक फेरीवाल्यास एक हजार रुपये वाढ जाहीर केलेली आहे. त्यांनी फेरीवाल्यांना खुप मदत केली आहे. गेल्या पंचवीस वर्षात त्यांच्या जलमंदिर येथे आम्ही फेरीवाले गेलो असता कधीही रिकाम्या हाताने पाठवले नाही. त्यांनी कोणतीही पर्वा न करता आम्हा सर्व हॉकर्सना तनमनधन स्वरुपात मदत केली आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. आतापर्यंत सातारा पालिकेने आत्मनिर्भर योजनेसाठी 1729 अर्ज आले आहेत. त्यात 867 जणांना लाभ मिळाला आहे. 1754 प्रकरणे प्रगतीपथावर आहेत. 586 जणांचा बायोमॅट्रीक सर्व्हे केलेला आहे. तरी पालिकेने संघटनेला हाताशी धरुन चांगले काम केलेले आहे. जो व्यावसायिक गेली दहा वर्षे फुटपाथवर व्यवसाय करतो आहे. त्यांचाच सर्व्हे केला आहे. एवढे सुंदर काम पालिकेने केलेले आहे. त्याबद्दल मुख्याधिकारी अभिजीत बापट, व त्यांचे सहकाऱयांचे फेरीवाल्यांकडून आभार. खासदार उदयनराजे यांचेही आभार, असेच त्यांनी काम करावे. व बारीकसारीक टीकाखोरांच्याकडे लक्ष देवू नये अशी विनंती पत्रकाद्वारे केली आहे. त्यामुळे या पत्रकामुळे सातारा शहरातील काही हॉकर्स हे आमदार शिवेंद्रराजे गटाचे आहेत. त्यांच्याकडूनही त्या पत्रकाला प्रतिउत्तर हे निघणार असल्याची चर्चा सुरु होती.