साताऱयातील घटना – दोघेजण फरारी
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील गोडोली येथे राहणाऱया पत्नी व मुलीला मारहाण, शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी एका वकिलासह त्याच्या मित्रावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोघेजण फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोडोलीत एक उच्चशिक्षित महिला तिच्या मुलीसमवेत रहात आहे. दि. 16 रोजी यातील संशयित ऍड. राजेश आनंदराव निकम (रा. रमाकांत टॉवर, यादोगोपाळ पेठ, सातारा) हे त्यांचे पती आहेत. त्यांनी व त्याचा मित्र अमोल कुलकर्णी (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) हे दोघेजण सायंकाळी साडेपाचच्या सुमारास महिलेच्या गोडोलीतील घरी गेले. तिथे राजेश निकम याने पत्नी व मुलीला शिवीगाळ करत त्यांच्या पोटात लाथ मारुन त्यांना मारहाण केली आहे. तर मुलीचा हात धरुन तिलाही मारहाण केली.
यावेळी राजेशचा मित्र अमोल कुलकर्णी याने महिला भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत असताना तिलाही धरले. तर राजेश निकम यांनी त्यांच्या मुलीच्या छातीला धरुन उचलून घेत तिच्याशी अश्लिल भाषेत या संवाद केला. इतकी वर्षे झाली लग्नाला तुझ्या आईने माझ्याशी व्यवस्थित संसार केला नाही. आता तू खूप मोठी व मस्त झालेली आहे. त्यामुळे तू माझ्याशी लग्न कर व तूच माझ्यासोबत झोपायला चल असे अश्लिल बोलत घाणेरडी शिवीगाळ करत मुलीच्या छातीवर लाथ मारुन तिला मारहाणही केली.
राजेश निकम व अमोल कुलकर्णी यांनी केलेल्या कृत्यामुळे दोघींचा विनयभंग झाल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले असून पोलिसांनी या दोघांवर मारहाण, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोकडे करत आहेत.