खारेपाटण चेकपोस्ट परिसर गर्दीने फुलला : रॅपिड टेस्ट सेंटर सुरू
दीड ते दोन लाख चाकरमानी : दाखल होण्याची शक्मयता
वार्ताहर / खारेपाटण:
गणेशोत्सव अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबईकर चाकरमान्यांनी सिंधुदुर्गात येण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने येणाऱया चाकरमान्यांमुळे खारेपाटण तपासणी नाका गर्दीने फुलून गेला आहे. खारेपाटण तपासणी नाक्मयावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात सुमारे दीड ते दोन लाख चाकरमानी सिंधुदुर्गात येण्याची शक्मयता असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. प्रशासनाच्या नियमानुसार सात ऑगस्टपर्यंतच चाकरमान्यांनी जिल्हय़ात दाखल व्हायचे असल्याने पुढील चौदा दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीसह चाकरमान्यांनी गणेशोत्सवापूर्वी सुमारे 20 ते 25 दिवस अगोदरच हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
सिंधुदुर्ग प्रशासनही आवश्यक ती उपाययोजना करून चाकरमान्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे. खारेपाटण तपासणी नाक्मयावर तपासणी करण्यात येत आहे. याठिकाणी रॅपिड टेस्ट सेंटर उभारण्यात आले आहे. प्रवाशांमध्ये कोरोना प्रादुर्भावाची लक्षणे आढळल्यास या ठिकाणी स्वॅब टेस्ट करून त्वरित विलगीकरण कक्षात नेण्याची सोय करण्यात आली आहे. इतर सर्व प्रवाशांची थर्मल गनद्वारा तपासणी करून प्रत्येकाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी खारेपाटण तपासणी नाक्मयावर विशेष महसूल व आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.
विनायक राऊत यांची भेट
खारेपाटण तपासणी नाक्मयावर खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी भेट देऊन आढावा घेतला. आरोग्य व महसूल विभागाच्या कर्मचारी व पथकांची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कर्मचाऱयांनीही स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी. शासनाने नेमून दिलेल्या नियमानुसार 14 दिवसांचा कालावधी सध्या प्रक्रियेमध्ये आहे. नवीन नियमावली जाहीर झाल्यास कळविले जाईल. कोणतीही अडचण निर्माण झाल्यास आपण जिल्हाधिकाऱयांशी बोलून योग्य ते नियोजन करू, असे राऊत यांनी सांगितले. यावेळी खारेपाटण शिवसेना विभागप्रमुख महेश कोळसुलकर, प्रसाद गाठे, संतोष गाठे, शिवाजी राऊत आदी उपस्थित होते. चाकरमान्यांना 14 दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक राहणार असून या नियमाची अंमलबजावणी न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गैरसोयींबाबत चाकरमानी संतप्त
खारेपाटण तपासणी नाक्मयावर चाकरमान्यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्या ठिकाणी वाद होत आहेत. प्रवाशांसाठी मुलभूत सुविधा योग्य प्रमाणात नसल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. शेकडो चाकरमान्यांना एकच मोबाईल टॉयलेट, पाण्याची गैरसोय व इतर सोयींचा अभाव यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप चाकरमान्यांकडून होत आहे.
रॅपिड टेस्टचा शुभारंभ
खारेपाटण तपासणी नाक्मयावर रॅपिड टेस्ट सेंटरचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय पोळ, राहूल जाधव, डॉ. नलावडे, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी प्रिया वडाम तसेच आरोग्य व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.