प्रतिनिधी/ बेळगाव
शेट्टी गल्ली येथील ट्रान्सफॉर्मर धोकादायक ठरत आहेत. दोनपैकी एका ट्रान्सफॉर्मरमधून वारंवार तेल गळती होत असून त्यामधून ठिणग्याही उडत आहेत. यामुळे रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्याशेजारीच हे दोन ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे हे ट्रान्सफॉर्मर हटवून त्या ठिकाणी नवे सिंगल पोलवरील ट्रान्सफॉर्मर बसवावेत, अशी मागणी रहिवाशांमधून केली जात आहे.
शहरात बऱयाच ठिकाणी धोकादायक ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यामधून तेल गळतीचे प्रकार वारंवार होतात. याचबरोबर योग्य दुरुस्तीअभावी स्पार्क होऊन त्याच्या ठिणग्या रस्त्यावर पडतात. असे ट्रान्सफॉर्मर हेस्कॉमकडून दुरुस्त केले जात आहेत. परंतु काही ट्रान्सफॉर्मर अत्यंत वाईट स्थितीत असून ते बदलल्याशिवाय पर्याय नाही.
शेट्टी गल्ली येथे मागील अनेक दिवसांपासून एक जुना ट्रान्सफॉर्मर आहे. जुन्या पद्धतीने दोन काँक्रिटच्या खांबांवर हा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. परंतु सध्या तो वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत सिंगल कॉंक्रीट पोलवर नवे दोन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी केली जात आहे. एकाच ट्रान्सफॉर्मरवर भार पडल्यामुळे वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी रहिवाशांमधून केली जात आहे.
यासाठी स्थानिक रहिवाशांनी हेस्कॉमच्या अधिकाऱयांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही समस्या मांडली. त्यावेळी त्यांनी वरि÷ अधिकाऱयांच्या सहमतीने लवकरच या ठिकाणी सिंगल पोल ट्रान्सफॉर्मर बसवून देऊ, असे सांगितले होते. त्यामुळे आता नागरिकांनीही याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.