शेती मालाशी व बि बियाणांच्या समस्या सोडविण्यासाठी मार्ग उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लॉकडाऊनच्या कालावधीत विविध उद्योगधंदे बंद व अन्य क्षेत्रातील उलाढाल ठप्प झाली आहे. तर दुसऱया बाजूला शेती क्षेत्राला या लॉकडाऊमधून वगळण्यात आले आहे. परंतु तरीही शेतीशी संबंधीत उत्पादनांची खरेदी विक्री करण्यासाठी मोठी समस्या निर्माण होत आहे. यातून शेतकऱयाला दिलासा मिळावा व पिकाचे नुकसान होऊ नये यांच्याकरीत केंद्रीय रस्ते अनुसंस्थान संस्था (सीएसआयआर आणि सीआरआरआय) यांच्याकडून किसान सभा या नावानी एक ऍप सादर करण्यात आले आहे.
या ऍपच्या आधारे देशातील वेगवेळय़ा ठिकाणचा शेती संबंधीत उत्पादनांचे वाहतूक करण्याची सुविधा या ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच पिकांची विक्री आणि अन्नधान्यांशी संबंधीत बिबियाणाची खरेदी करण्यासाठीच्या समस्येचे निराकरण होणार असल्याचे म्हटले आहे.
कृषी विज्ञान केंद्राचा समावेश
नुकतेच सादरीकरण करण्यात आलेल्या किसान ऍपच्या सुविधेमध्ये कृषी विज्ञान केंद्राचाही माहिती देण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण सीएसआयआरचे संचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी दिले आहे.