हरियाणा/प्रतिनिधी
हरियाणा करनालमध्ये शनिवारी भाजपच्या बैठकीच्या विरोधात शांतपणे निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर हरियाणा पोलिसांनी जबरदस्त लाठीचार्ज केला आहे. यामध्ये शेकडो शेतकरी रक्तबंबाळ झालेत. लाठीचार्ज झाल्यांनतर हरियाणातील एका एसडीएमचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना आंदोलकांची डोकी फोडण्याचा आदेश हे एसडीएम देत आहेत. त्यामुळे आयुष सिन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर कर्नालचे उपविभागीय दंडाधिकारी आयुष सिन्हा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ते पोलिसांना विरोध करणाऱ्यांचे डोके फोडण्यास सांगत होते. हेच आयुष सिन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी सांगितले आहे.
“अधिकाऱ्याने स्पष्टीकरण दिलंय की तो दोन रात्री झोपला नाही. पण त्याला माहित असावं की शेतकरी गेल्या ३६५ दिवसांपासून झोपलेले नाहीत. प्रशिक्षणादरम्यान अधिकाऱ्यांना संवेदनशील होण्याचे प्रशिक्षण देखील देण्यात येते. अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, एवढं मात्र नक्की.” असे चौटाला म्हणाले आहेत.