वृत्तसंस्था/ लंडन
ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीवीर आणि जागतिक दर्जाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याला कोरोनाची बाधा झाली असून तो सध्या विलगीकरणात आहे. लंडनमध्ये सध्या सुरू असलेल्या महिलांच्या ‘द हंडेड’ या स्पर्धेसाठी वॉर्नचे ब्रिटनमध्ये आगमन झाले होते. तो या स्पर्धेत खेळणाऱया लंडन स्पिरीट्स हा संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे.
रविवारी शेन वॉर्नला आपली प्रकृती बिघडल्याचे जाणवले. त्याला तापाची कणकण आणि सर्दी जाणवू लागली. लगेच त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला. शेन वॉर्नला काही दिवसांसाठी विलगीकरणात रहावे लागणार आहे. 51 वषीय शेन वॉर्नने 1992 ते 2007 या कालावधीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना 145 कसोटीत 708 बळी मिळवले आहेत.