प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर गट शिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत टिळकवाडी आणि अनगोळ क्लस्टर मधील प्राथमिक तसेच माध्यमिक, सरकारी, अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षकांना घरातून शिक्षण कार्याची माहिती टिळकवाळी क्लस्टर प्रमुख गिरिष जगजंपी यांनी दिली. यावेळी व्यासपिठावर ठळकवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक राजाराम कुडतूरकर सर, कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, स्वाध्याय मंदीरच्या मुख्याध्यापिका एच.आर. कुलकर्णी, सरकारी प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा उपाध्यक्षा जयश्री पाटील, प्राथमिक शिक्षक संघाचे बी.बी. सोगलण्णावर, आर.व्ही.हैबत्ती, असिफ अत्तार उपस्थित होते.१० नमुन्यात भरण्यात येणाऱ्या माहितीवर चर्चा झाली. विद्यार्थांना संपर्क करणे , शिक्षकांनी आपल्या विषयाची केलेली तयारी. पाठ टाचन, व्हिडिओ किंवा ऑडिओ मार्फत संपर्क केलेली नोंद, फोन कॉल द्वारे केलेला संपर्क त्यांची नोंद, पालकांच्या प्रतिक्रिया, जास्तीत जास्त मुले सहभागी होतील यासाठी केलेले प्रयत्न, एक ठिकाण ठरवून विद्यार्थ्यांचे तीन विभाग करुन त्यांना शिकविलेला भाग त्याची माहिती, शिकवण्यासाठी कोणकोणत्या युक्त्या वापरल्या त्या स्त्रोतांची माहिती, सेतूबंध संदर्भात माहिती, शिक्षकांनी तयार केलेली प्रश्न मंजुषा त्याच बरोबर प्रश्नपत्रिका इ.सर्व प्रकारे शिक्षकांनी माहिती शिक्षण खात्याकडे विशिष्ट तक्त्याद्वारे पाठवायची आहे. माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष यांनीही मार्गदर्शन केले. सरकारच्या योजनेचे कौतुक करतं चंदन वाहिनीवर मराठी माध्यमासाठी सेतू बंध अभ्यासक्रम दाखवला जात नाही याची खंत व्यक्त केली. प्राथमिकचे हैबती यांनीही आपले विचार मांडले. १७ जुलै ते ३१ जुलै या काळातील ही माहिती १ली ते दहावी पर्यंतच्या सर्व शिक्षकांनी त्यात इयत्ता८ते १०वी साठी ई क्लासची आधिक माहिती मुख्याध्यापकांच्या सही शिक्यासह गट शिक्षणाधिकारी कार्यालयात पाठवावयाचे आहे. या कार्यक्रमाला टिळकवाडी क्लस्टर आणि अनगोळ क्लस्टरच्या सर्व शाळांचे मुख्याधापक तसेच प्रतिनिधी म्हणून शिक्षक उपस्थित होते. स्वागत आणि आभार माध्यमिक शिक्षक संघाचे शहराध्यक्ष संजिव कोष्टी यांनी मानले.