मुंबई
श्याम मेटालिक्स अँड एनर्जी लिमिटेडचा आयपीओ येत्या 14 जूनला भारतीय भांडवली बाजारात सादर केला जाणार आहे. 14 जूनला बाजारात दाखल होणाऱया आयपीओतून कंपनी 909 कोटी रुपये उभारणार आहे. याआधी 1 हजार 107 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. स्टील निर्मिती क्षेत्रातील सदरील कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात 16 जूनला बंद होणार आहे. 657 कोटी रुपयांचे ताजे समभाग कंपनीकडून भांडवली बाजारात दाखल केले जाणार आहेत.