ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-श्रीनगर महामार्गावर नगरोटा येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. आज पहाटेपासून सुरू झालेली ही चकमक अजूनही सुरूच आहे.
श्रीनगर महामार्गावरील बान टोल प्लाझा येथे लष्करी जवानांना एक संशयित ट्रक दिसला. तो अडवल्यानंतर ट्रकमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात एक भारतीय जवान जखमी झाला. तर भारतीर जवानांनी तीक दहशतवाद्यांना ठार केले.
मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही सर्च ऑपरेशन सुरु असून यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. तर एक दहशतवादी लपला असल्याची शक्मयता असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नगरोटा या भागात शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.