ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नव्या दशकातलं पहिलं अधिवेशन असून या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात सकस चर्चा व्हावी. दिवसेंदिवस आपल्या चर्चेचा स्तर समृद्ध व्हावा, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
यंदाच्या अर्थसंकल्पीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगली कामगिरी करून आपण आगामी दशकासाठी चांगली मुहूर्तमेढ रोवली पाहिजे. या अधिवेशनात आर्थिक विषय आणि लोकांच्या सबलीकरणासंदर्भात व्यापक चर्चा व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे.
दरम्यान, आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमिवर मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प उद्या 1 फेब्रुवारीला सादर करणार आहेत. वाढती महागाई आणि सातत्याने घसरणारा विकासदर सावरण्याचं आव्हान सीतारामन यांच्यासमोर आहे.