ऑनलाईन टीम / श्रीनगर :
श्रीनगरच्या सीमेवरील मल्हुरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाघाला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही. सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई केली जात आहे. यात लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकांचा समावेश आहे.
मल्हुरा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने या परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला सुरक्षा दलाचे जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत. एका दहशतवाघाला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले असून, चकमक अजूनही चालू आहे.