‘मानिके मगे’ने इंटरनेटवर घातला होता धुमाकूळ
काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर सिंहली भाषेतील गाणे ‘मानिके मगे हिते’वरील अनेक रील्स पाहिल्या असतील. या रील्सना कोटय़वधी प्रेक्षक लाभले होते. या गाण्याला आवाज देणारी श्रीलंकेतील सिंगिंग सेंसेशन योहानी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणर आहे. भूषण कुमार निर्मित आणि इंद्रकुमार दिग्दर्शित ‘थँक गॉड’मधूत ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. चित्रपटात मानिके मगे गाण्याचे हिंदी स्वरुप सामील करण्यात आले आहे.
या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत मुख्य भूमिकांमध्ये दिसून येतील. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. हिंदी गाण्याला तनिष्क यांनी संगीतबद्ध केले आहे. भारतामधून मला प्रचंड प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे. हिंदी चित्रपटात माझ्या गाण्याचा वापर करणार आहेत ही माझ्यासाठी आनंदाची बाब असल्याचे योहानीने म्हटले आहे. योहानी यापूर्वी बिग बॉस 15 च्या प्लॅटफॉर्मवर सलमान खानसाब्sात दिसून आली होती.
मानिके मगे हिते गाणे मागील वर्षी मे महिन्यात युटय़ूबवर प्रदर्शित झाले होते. हे गाणे प्रचंड व्हायरल झाले होते. सिंहली भाषेत असल्याने या गाण्याचे शब्द समजत नसले तरीही योहानीच्या निरागस आवाजाने कोटय़वधी लोकांना वेड लावले होते.