प्रतिनिधी / सावंतवाडी:
महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व 365 खेडय़ांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा गुरुवार 4 फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो. यावर्षीही त्यानिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक, पूजा, पूजापाठ, भाविकांना दर्शन, तीर्थप्रसाद, भजन व सायंकाळी 7 वाजता सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाटय़ मंडळाचा नाटय़प्रयोग होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव उपरलकर देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक-शितप व शुभम नाईक-शितप यांनी केले आहे.