ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. सोमवारी 1 लाख 96 हजार 427 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. हा मागील 42 दिवसातील सर्वात कमी आकडा आहे. यापूर्वी 13 एप्रिलला 1 लाख हजार 306 रुग्ण आढळून आले होते. मागील 24 तासात 3 लाख 26 हजार 850 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 3511 रुग्णांचा मृत्यू झाला.
देशात आतापर्यंत 2 कोटी 69 लाख 48 हजार 874 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 40 लाख 54 हजार 861 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 25 लाख 86 हजार 782 रुग्ण उपचार घेत असून, 3 लाख 07 हजार 231 रुग्ण दगावले आहेत.
आतापर्यंत देशातील 19 कोटी 85 लाख 38 हजार 999 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.