अज्ञात इसमाविरूद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
लोणंद (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत मोटार सायकलवरून निघालेल्या वृद्ध महिलेचे मंगळसुत्र हिसकावून अज्ञातांनी पोबारा केला. संध्या लवळे (वय 62) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी अज्ञाताविरूद्ध लोणंद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संध्या लवळे या भोसले हाईट येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. तेथून दुचाकीवरून त्या घरी परत येत होत्या. यावेळी दोन अज्ञात इसमांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्यांच्या दुचाकीच्या मागे येत होते. तोच संध्या यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र हिसकावले आणि पोबारा केला. संध्या यांनी आरडाओरडा केला परंतु कोणतीही मदत मिळु शकली नाही. हे पाहून परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. संध्या यांनी तत्काळ लोणंद पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञाताविरूद्ध दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास ए.एस. आय वळवी करत आहेत.
चोरीच्या घटनामध्ये जिल्हा हिट लिस्टवर
गेल्या काही दिवसापासून सातारा शहरासह जिह्यात वाढत्या चोरीच्या घटना भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. घरफोडय़ा पाठोपाठ चेन स्नेचिंगच्या घटनामुळे असुरक्षिता निर्माण झाली आहे. या घटनांना आळा बसावा अशी मागणी होत असताना पोलीस दलाकडून पेट्रोलिंगचे प्रमाण कमी झाल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.