वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय संघातील अनुभवी अष्टपेलू रविंद्र जडेजाला दुखापतीमुळे बरेच दिवस क्रिकेटपासून अलिप्त राहावे लागत आहे. वारंवार पाठदुखापतीमुळे तो गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये खेळू शकला नाही. जडेजाची दुखापत आता बरी होण्याच्या मार्गावर असून आता तो आपल्या तंदुरुस्तीची चाचणी करण्यासाठी 24 जानेवारीपासून खेळवल्या जाणाऱया सौराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यातील रणजी सामन्यात भाग घेणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्यात भारताच्या दौऱयावर येणार आहे. उभय संघात होणाऱया चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय निवड समितीने पहिल्या दोन सामन्यांकरिता संघाची घोषणा यापूर्वीच केली आहे. 17 जणांच्या भरातीय संघामध्ये 34 वर्षीय रविंद्र जाडेजाचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिली कसोटी 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. या सामन्यापुर्वी जडेजाला आपली तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागेल. जडेजाने आतापर्यंत आपल्या क्रिकेट कारकीर्दीत कसोटीत 21.46 धावांच्या सरासरीने 82 गडी बाद केले असून फलंदाजीत त्याने 898 धावा जमवल्या आहेत. जडेजाने 2017 पासून 19 कसोटीत भारताचे प्रतिनिधीत्व केले असून त्याने दोन शतके आणि 7 अर्धशतके नोंदवली आहेत.