बेंगळूर / वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेतील प्रँचायझी आरसीबीच्या मुख्य प्रशिक्षकपदी संजय बांगर यांची नियुक्ती केली गेली आहे. आरसीबीने पुढील 2 वर्षांसाठी त्यांच्याशी करार केला. यापूर्वी फेबुवारीत संजय बांगर या संघाचे फलंदाजी सल्लागार म्हणून कार्यरत होते. आता मावळते प्रशिक्षक माईक हेस्सन यांच्याकडून ते मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारतील.
माईक हेस्सन यानंतरही डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स पदी कार्यरत राहतील. ऑस्ट्रेलियाच्या सायमन कॅटिचने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर हेस्सन यांच्याकडे अंतरिम कार्यभार सोपवण्यात आला होता. आता दोन वर्षांकरिता संजय बांगर यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली असल्याचे आरसीबीने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन जाहीर केले.