क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव ऍक्वेटिक रेसिडेन्स स्कायपार्क व स्कायनेस्ट, विशाल इन्फोबिल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात प्रथमच आयोजित केलेल्या ट्रायथ्लॉन स्पर्धेत संदीप शर्मा, भरत देवाप्पा, विनोद आर., जयदीप चाऊ यांनी या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. सांघिकमध्ये रणजीत शिंदे व ग्रुप आणि सनत भागी व ग्रुप यांनी विजेतेपद पटकाविले.
स्कायपार्क गॅलॅक्सी जलतरण तलाव येथे या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. किरण खोत, मुरगेश चन्नण्णावर, विजय बी. पाटील, बोनाव्हेंच्युरी पिंटो, साई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. बेळगावात प्रथमच ट्रायथ्लॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जलतरण, सायकलिंग, धावणे अशा तीन टप्प्यात ही स्पर्धा घेण्यात आली. या ट्रायथ्लॉन स्पर्धेत 114 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : सोलो डी 41 ते 60 वयोगट- 1) संदीप शर्मा (58.18), 2) सदानंद कुमार जी. (62.37), 3) शिवानंद धुमाले (73.05). सोलो ए 12 ते 16 वयोगट-1) भारत देव्याप्पा (23.52), 2) दर्शन वरूर, 3) तनिष्क मोरे. सोलो बी 17 ते 20 वयोगट- 1) विनोद आर. मंडय़ा बेंगळूर (24.28), सृष्टी पाटील, 3) श्रीहर्ष शिंत्रे. सोलो सी 21 ते 40 वयोगट- 1) जयदीप चाऊ (48.16), 2) कुणाल शिंत्रे, 3) शुभेंदू रेडेकर.
ग्रुप इव्हेंट -वरिष्ठ वयोगट (21 ते 60)- 1) रणजित शिंदे, महादेव कुंभार, सत्याप्पा बस्ती (48.43), 2) वरूण बल्लोली, वेंकटेश खोत, अनुपकुमार जांबोटी, 3) मोहित, जयदीप, राजकुमार कनिष्ट (10 ते 20 वयोगट)- 1) सनत अनंत भाटी, आदी शिरशट, अनिश कोरे (27.23), 2) सम्या मेणसे, प्रणाली जाधव, जान्हवी पेडणेकर 3) रेशमा कलंत्री, पांडुरंग घोरी, बसवंत ओसी.
प्रमुख पाहुणे डॉ. किरण खोत, मुरगेश चन्नण्णावर, विजय बी. पाटील, बोनाव्हेंच्युरी पिंटो, साई जाधव यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदके, चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एमआरएफ टायर, विशाल इन्फोबिल्ड, बेलगाम ऍक्वेटीक, स्कायपार्क, स्कायनेस्ट व जलतरण प्रशिक्षक साई डी. जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.