कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूरात वाढती रुग्ण संख्या आणि लॉकडाऊन संदर्भात आज जिल्ह्याधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला खासदार संभाजी राजे छत्रपती पूर्व नियोजित रायगड दौऱ्यामुळे उपस्थित राहू शकणार नाहीत. व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे होणाऱ्या या बैठकीला युवराज संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहू शकणार नसल्याचं सोशल मीडियावरून त्यांनी सांगितलंय. त्यामुळे त्यांनी या विषयीचं मत, सूचना, निरीक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेला आहे.
त्यांनी या सूचना पत्रकामध्ये मला काही होणार नाही, यापेक्षा माझ्यामुळे कोणाला काही होणार नाही याची दक्षता घ्या अस निक्षून सांगितलेलं आहे. लॉकडाउनमुळे पूर्ण प्रश्न सुटत नाही तर रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळं लोकांच्या सुरक्षिततेबरोबर आपण त्यांच्या उत्पन्नाचा काही मार्ग निघतो का अस पाहिलं पाहिजे, अस ही त्यांनी या सूचना पत्रकात सांगितलं आहे.