कणकवली / वार्ताहर-
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला झालेल्या चाकू हल्ल्याबाबत अटक व पोलीस कोठडीत असलेला सचिन सातपुते (रा. पुणे) याला पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. एस. ए. जमादार यांनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड. नितीन कुंटे तर संशयितार्फे मुंबई येथील अॅड. हर्षद साठे यांनी काम पाहीले. परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी आतापर्यंत सहाजणांना अटक झाली आहे. त्यातील पाच जणांची यापूर्वी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.