मुंबईप्रतिनिधी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकं ठेवल्याचं प्रकरण आणि मनसूख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएनं सचिन वाझे याला अटक केली आहे. प्रकृतीमुळे त्रस्त असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी सचिन वाझेनी मागितली होती. त्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे. दुसरीकडे एनआयएनं निलंबित मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि सुनील माने यांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.
दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकं ठेवल्याचं प्रकरण आणि मनसूख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएनं सचिन वाझे याला अटक केल्यानंतर वाझेला पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं. सध्या सचिन वाझे न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र या कारवाईनंतर सचिन वाझेंला हृदयविकाराचा त्रास होऊ लागला आहे. यासाठी सचिन वाझेकडून न्यायालयात खासगी रुग्णालयात उपचार मिळावेत यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आता न्यायालयाने वाझेला खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे.
प्रकृतीमुळे त्रस्त असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी सचिन वाझेनी मागितली होती. त्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे. दुसरीकडे एनआयएनं निलंबित मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि सुनील माने यांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.