प्रतिनिधी / सातारा :
सातारा बालसुधारगृह (रिमांडहोम) येथे सुरज शिंदे या अल्पवयीन मुलाने नुकतीच आत्महत्या केली. या घटनेला कारणीभुत असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, तसेच सुरज याच्या वडीलांना खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्यांनाही लवकरात लवकर बिना जामीन मुक्तता करावी, तसेच रिमांडहोम मधील अधिकारी वर्गांची कसून चौकशी करण्यात यावी, याबाबत दलिथ पँथरच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. हे उपोषण दलित पँथरचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विश्वास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या उपोषणात बहुसंख्य पारधी समाजबांधवांनी ही सहभाग दर्शविला होता.