गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्यामुळे खरेदीचा उत्साह द्विगुणीत
प्रतिनिधी/ बेळगाव
बाप्पाच्या स्वागतासाठी बेळगावची बाजारपेठ सज्ज झाली असून सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. शोभिवंत फुलांच्या माळा, विद्युत दिवे, थर्माकोल तसेच इतर सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बुधवारी ग्राहक दाखल झाले होते. यामुळे बऱयाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला.
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्यामुळे खरेदीचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. यामुळे बऱयाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बाजारालाही गर्दीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. गणरायाच्या आगमनामध्ये कोणतीच कसर राहू नये यासाठी आकर्षक असे सजावटीचे साहित्य खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. मोतीहार, शोभिवंत फुलांच्या माळा, झुंबर, लटकन, मेटल बॉल, मेटल चेन, स्टेप बॉल, चंद्रहार, किरीट, वेल्वेटचे बॉल, स्टीलच्या वर्कचे बॉल, गार्लिन यासह इतर साहित्य 20 रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत बाजारात दाखल झाले आहे.
आकर्षक फेटय़ांनी वेधले लक्ष
सजावटीच्या साहित्यामध्ये यावषी विविध प्रकारांमधील आकर्षक फेटे विक्रीस ठेवण्यात आले आहेत. लहान-मोठय़ा आकारात हे फेटे उपलब्ध आहेत. आकर्षक अशा जरीच्या फेटय़ांनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे. गणरायाच्या मूर्तीप्रमाणे ग्राहक फेटे खरेदी करत आहेत. 50 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत हे फेटे विक्री करण्यात येत आहेत.
देशी दिव्यांचा झगमगाट
यापूर्वी गणरायाच्या सजावटीसाठी चिनी दिक्यांच्या माळा बाजारात उपलब्ध होत होत्या. परंतु मागील दोन वर्षांमध्ये स्वदेशीचा झालेला प्रचार व चीनसोबतचे ताणलेले संबंध यामुळे या चिनी दिव्यांची मागणी मंदावली. यावषी बाजारात देशी दिव्यांचा झगमगाट पाहायला मिळत आहे. चिनी माळा असल्या तरी ग्राहकांकडून देशी माळांना पहिली पसंती दिली जात आहे.
पावसातही खरेदीसाठी गर्दी
मंगळवारपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. बेळगाव शहरासह उपनगरांमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारीही सकाळपासून पाऊस सुरूच होता. पावसाने काही काळ उसंत घेतली की खरेदीसाठी गर्दी होत होती. पाऊस सुरू असतानाही पांगुळ गल्ली, भातकांडे गल्ली या भागात खरेदी सुरूच होती.
पावसामुळे खरेदी मंदावली
-अभय खटावरकर (विपेते)
गणेशोत्सव काही दिवसांवर आली तरी अद्याप म्हणावा तसा खरेदीचा उत्साह दिसत नाही. कोरोनामुळे मागील वर्षी मोठा फटका विपेत्यांना बसला. तसाच फटका यावषीदेखील बसला आहे. रविवारी काही प्रमाणात खरेदीसाठी गर्दी झाली होती. मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे खरेदी पुन्हा एकदा मंदावल्याने त्यांनी सांगितले.