ऑनलाईन टीम / पुणे :
सणसवाडी औद्यागिक क्षेत्रातील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे प्रचंड धुराचे लोट दूरपर्यंत पाहायला मिळत आहेत. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील पुणे महामार्गालगत असलेल्या सणसवाडी औद्योगिक परिसरातील एका कंपनीला सकाळी 11 च्या सुमारास भीषण अशी आग लागली आहे.
सणसवाडीजवळील एल अँड टी फाटा येथील ब्राईट कंपनीला ही भीषण आग लागली. आगीने संपूर्ण कंपनीला वेढा घेतला असून घटनास्थळी काळ्या धुराचे लोट आणि आगीचे लोळ दिसत आहेत. या प्रचंड आशा धुरामुळे आग विझविण्याचा अडथळे येत आहे.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, सदर कंपनीच्या चारही बाजूने अनेक कंपन्या असून त्या कंपन्यांना देखील धोका निर्माण झाला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.