मोर्ले येथे नवीन चार रुग्णाचा समावेश : पर्ये,केरी,मोर्ले लाँकडाऊन सुरुच
वाळपई / प्रतिनिधी
कोरोना रुग्णाबाबतीत सत्तरी तालुक्मयात दिवसेंदिवस गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण होत आहे. कालपर्यंत (सोमवारपर्यनँत) सत्तरी तालुक्मयामध्ये एकूण सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये आणखीन सातजणांची भर पडली असून आता सत्तरी तालुक्मयांमध्ये कोरोना रोगाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अकरावर पोहोचली आहे .यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्य खात्याच्या यंत्रणेमार्फत वेगवेगळय़ा ठिकाणी जनजागृती तपासणीची प्रक्रिया हाती घेण्यात आलेली आहे.
गेल्या तीन दिवसापासून केरी भागांमध्ये नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन घेतलेल्या लाँकडाऊनला चांगल्या प्रकारचे सहकार्य मिळत आहे. आज दिवसभर मोर्ले, शिरोली या ठिकाणी एकूण जवळपास 180 जणांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून यासंदर्भात नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.
गेल्या चार दिवसापासून सत्तरी तालुक्मयात अचानकपणे कोरोना रोगाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे मोठय़ा प्रमाणात सतर्कता निर्माण झालेली आहे. वाळपई नगरपालिका केरी ग्रामपंचायत ,पर्ये ग्रामपंचायत मोर्ले ग्रामपंचायत, गुळेली ग्रामपंचायत व भिरोंडा पंचायत यांनी उघडपणे टाळेबंदी लागू केलेली आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून संबंधित भागातील दुकाने आस्थापने बँका पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत.
मोर्ले चार नवीन रुग्ण.
दरम्यान तीन दिवसापूर्वी आरोग्य खात्यात काम करणारा आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची पत्नी व दोन मुले पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पुन्हा साखळी रुग्णालयाच्या माध्यमातून गावातील सुमारे 50 जणांची चाचणी घेण्यात आली होती .त्यांचा अहवाल आज आला असून यामध्ये चार रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झालेले आहे. यामुळे आता मोर्ले याठिकाणी एकूण रुग्णांची संख्या आठवर पोहोचलेली आहे. यामुळे गावांमध्ये निर्माण झालेली गंभीर स्वरूपाची परिस्थिती हाताळण्यासाठी सरपंच विद्या सावंत यांनी कंबर कसली असून आज साखळी सामाजिक रुग्णालयाच्या माध्यमातून गावातील 112 जणांची नव्याने चाचणी करण्यात आलेली आहे . त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून यासंदर्भातला अहवाल बुधवारी येण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे.
शिरोली दोन रुग्ण.
दरम्यान केरी पंचायत क्षेत्रातील शिरोली गावामध्ये आतापर्यंत फक्त दोनच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. यामुळे आज दिवसभर सदर भागांमध्ये नवीन चार रुग्ण आढळून आल्याची माहिती पसरल्यानंतर गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र साखळी सामाजिक रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात एकूण 55 जणांची नव्याने चाचणी करण्यात आली असून त्यासंदर्भात अहवाल उद्या प्राप्त होणार आहे. मात्र याठिकाणी अजून नवीन रुग्ण सापडला नसल्याचे त्याने स्पष्ट केलेले आहे. यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगणे गरजेचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गुळेली याठिकाणी चार दिवसापूर्वी आरोग्य खात्यात काम करणारा कर्मचारी पॉझिटिव्ह झाल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी करून इतर जवळपास साठ जणांची तपासणी करण्यात आली होती. मात्र सर्वांचे निकाल नकारात्मक आल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी स्पष्ट केलेले आहे. यामुळे सत्तरी तालुक्मयात आतापर्यंत 11 पॉझिटिव रुग्ण आढळून आलेले आहेत.
मोर्ले–08
शिरोली-02
गुळेली-01
एकुण 11
साखळी रुग्णालयाचे काम चांगले.
दरम्यान सत्तरी तालुक्मयामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढणारी रुग्णांची संख्या व सत्तरीतील केरी, मोर्ले व पर्ये आदी भागात साखळी सामाजिक रुग्णालयाशी संलग्न करण्यात आल्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यारुग्णालयाची पथक अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे .गेल्या तीन दिवसापासून त्यांनी या भागांमध्ये कंबर कसली असून याठिकाणी जनजागृती व तपासणी करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आलेली आहे .यासंदर्भात मोर्ले पंचायतीचे सरपंच विद्या सावंत यांनी डाँँ.देसाई व त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले असून त्यांनी आतापर्यंत उत्तम प्रकारे काम केल्याचे स्पष्ट केले आहे.
केरी गावाची बदनामी करणाऱया विरोधात संतापाची लाट.
दरम्यान मोर्ले याठिकाणी कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर शेजारील केरी भागामध्ये मोठय़ा प्रमाणात सतर्कता निर्माण झालेली आहे .गेल्या चार दिवसापासून नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन याभागांमध्ये पूर्णपणे टाळेबंदी हाती घेतलेली आहे .भागातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते सरपंच पंच यांनी या भागातील दुकानदार व इतरांना टाळेबंदीमध्ये सहभागी होण्याचे विनंती करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभला. फक्त एक दुकानदार वगळता केरी भागांमध्ये पूर्णपणे लाँकडाऊन करण्यात आलेले आहे .मात्र गोव्यातील एका वर्तमान पत्राकडून याभागातील दुकानदाराला धमकी देऊन जबरदस्तीने दुकाने बंद करण्यात लावल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर याभागातील नागरिकांनी संतापाची भावना व्यक्त केलेली आहे. याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना
चंद्रकांत परब,नारायण गावस,प्रदीप गाड,
यांनी याभागातील एक दुकानदार अशा प्रकारे केरी गावांची व नागरिकांची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱया एका दुकानदाराकडून यामध्ये सहभागी न होता उलटअर्थी या भागातील सामाजिक क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱया नागरिकांची बदनामी करण्याचा हा खटाटोप कदापि नागरिक सहन करणार नसल्याचा इशारा नागरिकांनी दिलेला आहे.
अडवई गावाची बदनामी नको.
दरम्यान अडवई सत्तरी याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची चुकीची माहिती सध्या सोशल मीडियावरून फिरत आहे .याबद्दल सरपंच उदयसिंह राणे यांनी खेद व्यक्त केलेला आहे. अशा प्रकारची माहिती पोहोचवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे काहींचे उद्देश अत्यंत कटू असून त्याच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये अशा प्रकारचे विनंती केली आहे.