प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवसेना राज्यात सत्तेवर असताना कोल्हापूर जिल्हÎात मात्र पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या कामाला गती नाही. सदस्य नोंदणीतही कोल्हापूर जिल्हा मागे आहे. ही बाब गंभीर आहे, अशा शब्दात शिवसेनेचे संपर्क नेते, माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरूवारी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.
जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱयांसह खासदार, आजी, माजी आमदार यांची बैठक रावते यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी संपर्क प्रमुख अरूण दूधवडकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशिल माने, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरूडकर, उल्हास पाटील यांच्यासह उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
रावते यांनी जिल्हा शिवसेनेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कोल्हापूर जिल्हÎात शिवसेनेचे दोन खासदार आहेत.
पदाधिकारी वर्षांनुवर्षे पदे भोगत आहेत. पण संघटनात्मक वाढीसाठी किती प्रयत्न झाले?, पक्षासाठी सदस्य नोंदणीत कोल्हापूर मागे का? याचा विचार व्हावा. आज शिवसेनेची राज्यात सत्ता आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री ठाकरे राज्यातील जनतेसाठी धैर्याने लढत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांचा सामना करत आहशेत. आज राज्यात आपल्या पक्षाची सत्ता असताना जिहÎात पक्ष वाढविण्याची संधी आहे. त्यासाठी गटतट विसरून कामाला लागा, अशा सूचनाही रावते यांनी दिल्या.
गोकुळ, महापालिका, ग्रामपंचायत निवडणूक पुढे आहे
आगामी काळात कोल्हापूर महापालिकेची निवडणूक आहे. गोकुळचीही निवडणूक आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत व इतर निवडणुकाही आहेत. त्या डोळÎासमोर ठेवून आतापासून पक्ष वाढवा, सदस्य नोंदणी करा, यापुढे गटतट चालणार नाही, कामाला लागा, अशा सूचनाही रावते यांनी केल्या.
राजेश क्षीरसागर, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे अनुपस्थित
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर, शहर शिवसेना प्रमुख रविकिरण इंगवले आणि युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य हर्षल सुर्वे या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांना बैठकीचे निमंत्रण दिले होते की, नाही याची चर्चा बैठकीनंतर शिवसैनिकांत सुरू होती.