एकाच महिन्यात आढळले 2,525 रुग्ण, 73 जणांचा मृत्यू : सर्वाधिक रुग्ण कणकवली तालुक्यात, सर्वाधिक मृत्यू सावंतवाडी तालुक्यात
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी सप्टेंबर घातक महिना ठरला आहे. जिल्हय़ात मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून मागच्या सहा महिन्यांत जे घडले नाही, ते एका महिन्यात घडले आहे. पहिल्या सहा महिन्यांत कोरोना बाधित 1 हजार 287 रुग्ण आढळले आणि 20 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर सप्टेंबर या एका महिन्यात तब्बल 2 हजार 525 रुग्ण आढळले. पैकी 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
30 सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ात आढळलेल्या एकूण 3 हजार 812 रुग्णांपैकी कणकवली तालुक्यात सर्वाधिक 1 हजार 315 रुग्ण आढळले. तर सर्वात कमी रुग्ण वैभववाडी तालुक्यात (131) आढळले. तसेच कोरोनाने मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू सावंतवाडी तालुक्यात (26) झाले आहेत. दोडामार्ग तालुक्यात सर्वात कमी (1) रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोनाचा पहिला रुग्ण 26 मार्चला आढळला. त्यानंतर महिनाभरानंतर 29 एप्रिलला दसरा रुग्ण आढळला. त्यानंतर हळूहळू थोडय़ाफार प्रमाणात रुग्ण आढळू लागले. जुलै महिना अखेरपर्यंत कोरोनाची स्थिती नियंत्रणात होती. मार्च ते जुलै या पहिल्या पाच महिन्यांत 374 रुग्ण आढळले आणि सहाजणांचा मृत्यू झाला होता. ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवासाठी जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांची संख्या वाढू लागताच कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आणि मृत्यू होणाऱयांची संख्या 20 झाली होती. गणेशोत्सव झाल्यानंतर जिल्हय़ाबाहेरून आलेले नागरिक पुन्हा परतले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात 80 टक्के लोक परत गेले. मात्र तोपर्यंत जिल्हय़ात कोरोनाचा फैलाव वेगाने झाला होता. मार्च ते ऑगस्टदरम्यान जे घडले नाही, ते एका सप्टेंबर महिन्यात घडले. या एका महिन्यात तब्बल 2 हजार 525 कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिना सिंधुदुर्गसाठी घातक ठरला आहे.
सिंधुदुर्गात 3,812 बाधित, 93 जणांचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्हय़ाची आजची स्थिती पाहिली, तर 30 सप्टेंबर अखेरपर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 हजार 812 झाली आहे. 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच समाधानाची बाब म्हणजे कोरोना बाधित रुग्ण आणि मृत्यूची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत 2 हजार 748 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना सक्रिय 971 रुग्ण आहेत.
सर्वाधिक रुग्ण कणकवलीत, मृत्यू सावंतवाडीत
आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांमध्ये कणकवली तालुक्यात सर्वाधिक 1 हजार 315 रुग्ण आढळले आहेत. हजाराचा आकडा गाठणारा हा एकमेव तालुका आहे. त्यापाठोपाठ कुडाळ तालुक्यात 836, सावंतवाडी – 495, वेंगुर्ले – 345, मालवण – 273, देवगड – 252, दोडामार्ग – 152 आणि वैभववाडी तालुक्यात सर्वात कमी 131 रुग्ण आढळले आहेत. 13 रुग्ण जिल्हय़ाबाहेरील होते.
जिल्हय़ात कोरोनाने आतापर्यंत 93 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू सावंतवाडी तालुक्यात (23) जणांचा मृत्यू झाला आहे. तर सर्वात कमी दोडामार्ग तालुक्यात (एक रुग्ण) मृत्यू झाला आहे. तसेच कणकवली – 19, कुडाळ – 18, मालवण – 10, वैभववाडी – 7, वेंगुर्ले – 7, देवगड – 4, तर जिल्हय़ाबाहेरील एका रुग्णाचा जिल्हय़ात मृत्यू झाला आहे.
महिनाभरात कोरोना नियंत्रणात!
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने चांगले काम केले आणि नागरिकांनीही सतर्कता दाखविली. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवता आले. सप्टेंबरमध्ये अचानक रुग्णसंख्या वाढली असली, तरी आरोग्य सेवेतील उणिवा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा रुग्णालयात पुरेसा औषध साठा, ऑक्सिजन पुरवठा, चांगला आहार, वैद्यकीय सुविधा देण्यात येत आहेत. बाधित डॉक्टर व नर्स कोरोनामुक्त होऊन पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे आता कोरोना बाधित रुग्णांना चांगली सेवा मिळत आहे, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले. मृत्यूचे प्रमाण वाढले असले, तरी त्यातील बहुतांश रुग्ण हे व्याधीग्रस्त आणि वयोवृद्ध होते. याचे गांभीर्य ओळखून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करून व्याधीग्रस्त रुग्णांची यादी केली जात आहे. त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱयांवर तात्काळ उपचार केले जात आहेत. त्यामुळे ‘माझे कुटुंब..’ मोहीम यशस्वी झाल्यास निश्चितच सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन नियंत्रण मिळवू, असा विश्वास जिल्हाधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्गातील सप्टेंबरपर्यंत कोरोना रुग्णांची स्थिती
तालुका कोरोना बरे झालेले रुग्ण मृत्यू सक्रिय बाधित रुग्ण
देवगड 252 203 4 45
दोडामार्ग 152 123 1 28
कणकवली 1315 952 19 344
कुडाळ 836 592 18 226
मालवण 273 197 10 66
सावंतवाडी 495 349 26 120
वैभववाडी 131 104 7 20
वेंगुर्ले 345 222 7 116
जिल्हय़ाबाहेरील 13 6 1 6
रुग्णएकूण 3812 2748 93 971