मुंबई : देशातील दुसऱया नंबरची दिग्गज टेक कंपनी इन्फोसिसचा तिमाही नफा वधारल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सप्टेंबर तिमाहीत निव्वळ नफा 4,845 कोटी रुपयांवर राहिला आहे. एक वर्षाच्या अगोदर समान तिमाहीच्या तुलनेत हा नफा 20.5 टक्क्यांनी अधिक राहिला आहे. कंपनीचा महसूलही याचदरम्यान 8.5 टक्क्यांनी वाढून 24,570 कोटी रुपयांवर राहिला आहे. वर्षामागे हा महसूल 22 हजार 629 कोटी रुपयांवर होता.
डिजिटल सेवांच्या माध्यमातून कंपनीने 3 टक्के अधिक महसूल प्राप्त केला आहे. कंपनीने प्रति समभागामागे 12 रुपये अंतरीम लाभांश जाहीर केलेला आहे.