आपले वजन अचानक वाढू लागले किंवा पाय, गुडघेदुखी होण्याबरोबरच चेहरा, हात आणि पोटावर सूज येऊ लागली तर ही समस्या वॉटर रिटेंशनशी निगडीत असू शकते.
- या आजारात शरिराच्या आतील भागात पाणी जमा होते. याचाच अर्थ शरीरात पाणी आणि मिठाचे प्रमाण अधिक असणे.
- या कारणामुळे शरिराच्या विविध भागात अंगदुखी आणि सूज येण्याची समस्या उदभवू शकते. पावसाळा आणि हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांच्या हाता-पायावर सूज येते. ही लक्षणे या आजारपणाचाच भाग आहेत.
- शरीरात अशा प्रकारचे बदल हे हार्मोनल किंवा जेवणात गरजेपेक्षा अधिक मीठ तसेच दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसण्याच्या कारणावरुन देखील होऊ शकते. शरीरातील अतिरिक्त पाणी टिश्यूत भरले जाते आणि शरिराचे बाह्य ऑर्गन्स फुगल्यासारखे वाटतात. परिणामी हे आजारपण फैलावू शकते. आपल्याही ही लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नये.
- जीवनशैलीत बदल करुन या आजारावर नियंत्रण ठेवू शकतो. सर्वात अगोदर म्हणजे आपण बाहेरचे जेवण टाळायला हवे. त्याचबरोबर बाबंद खाद्यपदार्थापासून चार हात लांब राहणे गरजेचे आहे. बाहेरच्या जेवणात किंवा आहारात गरजेपेक्षा अधिक मीठ असते. दुसरे म्हणजे बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहण्याऐवजी एक निश्चित काळापर्यंत चकरा, फेर्या मारणे गरजेचे आहे.
- कार्यालयात काम करताना चहाच्या निमित्ताने ऑफिसबाहेर रपेट मारायला हवी.
- शरिरात पाणी आणि मीठ वाढू नये यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करावा. नियमित व्यायाम करण्याची सवय ठेवावी. आपण मद्यपान करत असाल तर त्याचे सेवन तात्काळ बंद करावे. डॉक्टराच्या सल्ल्यांशिवाय कोणतेही औषध घेणे हानीकारक ठरु शकते. आहार आणि वजन संतुलित ठेवल्यास अशी समस्या निर्माण होत नाही. परंतु समस्या वाढल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.