बेळगाव : समादेवी संस्थानच्यावतीने समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला. या महोत्सवाची सांगता मंगळवारी महाप्रसादाने झाली. चार हजाराहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारपासून जन्मोत्सव सोहळय़ाला सुरूवात झाली. दररोज काकड आरती, भजनी कार्यक्रम, महिलांसाठी कार्यक्रम, लहान मुलांच्या स्पर्धा व भक्तीगीत, भावगीतांचा कार्यक्रम पार पडला. मंगळवारी सकाळी 6.30 ते 12 या वेळेत नवचंडिका होम करण्यात आला. त्यानंतर समादेवी सभागृहात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. बेळगाव परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी सकाळपासून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या पदाधिकाऱयांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. यावेळी समादेवी भक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Previous Articleदेवेंद्र जिनगौडा शाळेत प्रथमोपचारावर व्याख्यान
Next Article पथदीप नसल्याने उद्यमबाग अंधारात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.