वार्ताहर /माशेल
सम्राट क्लब माशेलतर्फे कोविड काळात जीवाची पर्वा न करता जनतेचे रक्षण केलेल्या कोरोना वॉरिअर्सचे कार्यालयात जाऊन रक्षा बंधन साजरे केले. कांपाल-पणजी येथील पोलीसदलाचे कर्मचारी, सैन्यदल, इस्पितळातील कर्मचारी व पत्रकारांना औक्षण केल्यानंतर राखी बांधण्यात आली.
यावेळी क्लबचे अध्यक्ष काजल चोडणकर, मनोज कारापूरकर, अनिता रायकर उपस्थित होते. क्लबच्या महिला कार्यकर्त्यातर्फे प्रंटलाईन वॉरिअर्सची ओवाळणी करून त्यांना मिठाई व भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. यावेळी काजल चोडणकर यांनी रक्षा बंधनाचे महत्व पटवून दिले. मनोज कारापूरकर यानी स्वागत केले. अनिता रायकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वेश फुलारी, सिद्धी तारी, विश्वजीत शेट्टीगर यांन परिश्रम घेतले.