वार्ताहर /दाभाळ
कोडली तिस्क येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक नुकतीच होऊन दिलीप गावकर यांची सलग तिसऱयावेळी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सचिवपदी रमाकांत गुणो गावकर तर खजिनदारपदी लक्ष्मीकांत नाईक यांची निवड करण्यात आली आहे. यंदा सात दिवस गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.