सांखळी/प्रतिनिधी
सरकारी जाग्यावर होणारी अतिक्रमणे रोखून धरण्यासाठी शासकीय अधिकाऱयांनी लक्ष घालण्याची गरज असून कामावर ये-जा करताना एखाद्या सरकारी जागेवर सुरू असलेले काम त्वरित बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. आज 5रोजी सकाळी सांखळी नगर पालिका कार्यालय बैठक कक्षात ही बैठक बोलवण्यात आली होती
साखळी नगरपालिकेच्या विकासासंबंधी चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सर्व प्रमुख खात्यांचे वरि÷ अधिकारी, साखळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष . यशवंत माडकर नगरसेवक रश्मी देसाई, शुभदा सावई कर, आनंद काणेकर, दयानंद बोरयेकर ब्राम्हनंदउपस्थित होते.
गोव्यातील सरकारी मालकीच्या जागेची राखण करण्याची जबाबदारी ही स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर सरकारी अधिकाऱयांनी उचलण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेत होणारे अतिक्रमण संबंधित खात्यातील स्थानिक अधिकाऱयांनी तक्रार करून वेळीच जमीनदोस्त करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारी जागा बळकावण्याची काहींना सवय झालेली असून ती रोखण्यासाठी कडक उपाययोजना आखण्यासाठी सरकारी यंत्रणेने पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले. सरकारी कामांना चालना देण्यासाठी सर्व घटकांनी जबाबदारीने वागण्याची गरज असून राज्याचा वार्षिक महसूल वाढविण्याची व नको असलेला खर्च रोखून धरण्याचे काम केवळ सरकारी अधिकारीच करू शकतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
एखाद्या भागाचा पंचायतीचा, नगरपालिकेचा किंवा तालुक्मयाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी सरकारबरोबरच, सरकारी खात्यांची आहे. त्यासाठी ’व्हिजन डॉक्मयुमेंट’ तयार करण्याची गरज आहे. विकासाच्या बाबतीत दूरदृष्टीचा टप्पा गाठण्यासाठी सर्व खातेप्रमुखांनी या बाबींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सर्व खातेप्रमुखांनी यासंबंधीचा अहवाल तयार करून आपल्या हाताखाली काम करणाऱयांकडे देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
साखळी नगरपालिका क्षेत्राच्या विकासकामासंबंधी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, साखळी नगरपालिकेच्या विकासासंबंधीचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून तो गोवा राज्य साधनसुविधा महामंडळाकडे आहे. त्यातील साधारण 40-50 टक्के विषयांवर चर्चा झाली असून राहिलेले विषय घेण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. साखळी नगरपालिकेच्या नगरसेवकांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
बैठकीला डिचोली उपजिल्हाधिकारी श्री. राजेश आजगांवकर, डिचोलीचे मामलेदार तथा साखळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. प्रविंजय पंडित, वीजखाते, सार्वजनिक बांधकाम खाते, नगर नियोजन, गोवा साधन सुविधा महामंडळ, पुरातत्त्व खाते व इतर खात्याचे वरि÷ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
यावेळी साखळी नगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्भवलेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये वीज खांब्याचे स्थलांतर, लाईनमनची व्यवस्था, वीज जोडणी, साखळी मलनि:सारण प्रकल्पासंबंधी चर्चा झाली. यामध्ये नवीन जोडणी व घरातील सांडपाणी सार्वजनिक गटारांमध्ये सोडणाऱयांवर कडक कारवाई करण्याचे ठरले.
साखळी भागातील रस्त्यांची डागडुजी, मासळी मार्केट, पार्किंग व्यवस्था, दुकानदारांचे नव्या जागेत पुनर्वसन आदी बाबींवर सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरील प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सर्व खाते प्रमुखांनी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.