रत्नागिरी तालुक्यातील सरपंच पद आरक्षणाची लॉटरी फुटली
एकूण 48 ग्रामपंचायतींसाठी महिलांसाठी राखीव आरक्षण
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यात ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षणाच्या ‘लॉटरी’कडे डोळा ठेवून बसलेल्यांपैकी अनेकांचे नशीब फळफळले तर अनेकांनी गुडघ्याला बांधून ठेवलेली बाशिंगे पुन्हा उतरवून ठेवण्याची वेळ आली. या आरक्षणाच्या लॉटरीत एकूण 94 ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती (स्त्री राखीव), नागरिकांच्या मागास पवर्ग (स्त्री राखीव), सर्वसाधारण पवर्ग व त्यात स्त्री राखीव अशा सर्व पवर्गासाठी आरक्षणाची सोडत निघाली.
ही आरक्षणाची सोडत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. स्वरा दाभाडे या मुलींने यावेळी आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या. त्यावेळी काढलेल्या सरपंच आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण पवर्गासाठी 32 ग्रामपंचायतीं राखीव झाल्या आहेत.
त्या ग्रामपंचायतींमध्ये हरचेरी, मजगाव, गावखडी, शिवार आंबेरे, तरवलं, चांदेराई, सैतवडे, विल्ये, देवुड, काळबादेवी, चवे, साखर मोहल्ला, दांडे आडोम, कशेळी, डोर्ले कोतवडे, पिरंदवणे, फणसवळे, हातखंबा, कोळंबे, मिऱया, खालगाव, जांभारी, जयगड, धामणसे, गावडे आंबेरे, पोमेंडी खुर्द, रीळ, नेवरे, कापडगाव, नाचणे यांचा समावेश आहे.
तसेच सर्वसाधारण पवर्ग (महिला राखीव) ग्रामपंचायतींमध्ये चरवेली, आगरनरळ, राई, गुंबद, चांदोर, निवेंडी, साठरे, लाजुळ, मालगुंड, ओरी, निवळी, मेर्वी, पानवल, मावळंगे, गणपतीपुळे, शिरगाव, वेळवंड, बसणी, कुवारबाव, सडामिऱया, कुरतडे, नाखरे, चाफे, कळझोंडी, भोके, रानपाट, भाट्ये, भगवतीनगर, पावस, करबुडे, निरुळ यांचा समावेश आहे. नागरिकांचा मागास पवर्गासाठी काढलेल्या सरपंच आरक्षण सोडतीमध्ये ग्रामपंचायत बोंडये, गडनरळ, वरवडे, सतकोंडी, टिके, खानु, नाणीज, टेंभ्ये, वेतोशी, खेडशी, मिरजोळे, वाटद यांचा समावेश आहे.
नागरिकांचा मागास पवर्ग (महिला राखीव) ग्रामपंचायतींमध्ये गणेशगुळे, कर्ला, केळये, पूर्णगड, कासारवेली, झरेवाडी, सोमेश्वर, कासारी, पोमेंडी बु., गोळप, फणसोप, नांदीवडे, चिंद्रवली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
यावेळी अनुसूचित जाती पवर्गासाठीचे सरपंच आरक्षण लोकसंख्येच्या पमाणात सन 2011 च्या जनगणनेनुसार काढण्यात आले आहे. त्या आरक्षणासाठी विल्ये, सैतवडे, वळके, चरवेली, गडनरळ, खानू, जांभरूण, साठरे, गुंबद, तोणदे, चाफेरी, सडामिऱया, उक्षी, पाली, खरवते अशा ग्रामपंचायती समोर ठेवण्यात आल्या होत्या. पण यावेळी अनुसूचित जाती पवर्गासाठी वळके, जांभरूण, खरवते या ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे.
तर अनुसूचित जाती (महिला पवर्ग) ग्रामपंचायतींमध्ये काढलेल्या सोडतीत तोणदे, चाफेरी, उक्षी, पाली या ग्रामपंचायतींची वर्णी लागली आहे. या आरक्षणामुळे आता गावोगावी सरपंचपदाची माळ गळ्यात घालण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी व विविध राजकीय पक्षांच्या, पŸनेलपमुखांकडे फिल्डिंग लावण्यात आली आहे.