आमदारांनी केली म्हापसा बाजारपेठेची पाहणी
प्रतिनिधी / म्हापसा
म्हापशात पहिल्या दिवशी म्हापसा बाजारपेठेत लॉकडाऊन पूर्णपणे बंद झालेले आहे. सर्वांनी स्वतःहून दुकाने बंद ठवली आहे. हे सोमवारपर्यंत दुकानदारांनी पाळावे असे आवाहन म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी केले. दररोज रुग्ण वाढत आहे आज 25 नवीन रुग्ण आहे. म्हापशात दहा ठिकाणी लघु क्षेत्र संचारबंदी लागू केरण्यात आली आहे. उपजिल्हाधिकाऱयांनी सर्वत्र लक्ष ठेवले आहे. म्हापसा वासियांनी स्वतःहून काळजी घ्यावी कुटुंबियांची काळजी घ्यावी. फक्त 3 दिवसांचे लॉकडाऊन आहे. जेणेकरून याचा फायदा पुढे होणार आहे. गरजेसाठी दुकाने खुली आहे असे आमदार म्हणाले.
सर्वांनी लसीकरण घ्यावे
उद्यापासून 18 वर्षावरील लसीकरण सुरू होणार होते ते काही दिवसापुढे ढकलले आहे. 45 वर्षासाठी आझिलो जिल्हा इस्पितळात सुरू आहे. तेथे कोविड रुग्ण येणार नाही. सर्वांनी लस घ्यावी. गेल्या वर्षी सर्वांनी स्वतःची काळजी घेऊन पुढे गेलो होतो मात्र यंदा परिस्थिती कठीण आहे.
आमदाराकडून सर्वांचे आभार
म्हापशात गरज भासल्यास कोविड केंद्र सुरू करूया सर्व सरकारी यंत्रणा याबाबत सर्वत्र लक्ष ठेवून आहे. सध्या 3 दिवस लॉकडाऊन आहे नाहक पॅनिक नको. लोकांनी सांभाळून खरेदी करावी. स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे. आम्ही घरी राहिल्यास कोरोना कुठेतरी कमी होईल. म्हापसा वासियांनी सर्वकाही बंद ठेवल्याने सर्वजण अभिनंदनास पात्र आहे. बंदीमुळे खूप त्रास होतो हेही आम्हाला माहीत आहे. इंडियन मॅडिकल असोसिएशन 15 दिवसाची मागणी केली आहे. मात्र सरकारने लॉकडाऊन करण्यापेक्षा सर्वांनी घरी स्वतःहून काळजी घेतल्यास बरे होईल. रुग्णांची संख्या वाढत आहे तेही कमी करता येईल. म्हापशातील लघु क्षेत्रासाठी निवडणूक जबाबदार म्हणता येणार नाही. पण निवडणूक घेणे गरजेचे होते. परत पुढे ढकलणे योग्य नव्हते असे आमदार जोशुआ डिसोझा म्हणाले.
मंत्री मायकल लोबो यांनी म्हापशात लुडबूड करू नये मी समर्थ आहे- आमदार जोशुआ डिसोझा
मंत्री मायकल लोबो यांनी म्हापशात नाहक लुडबुड करू नये. म्हापशात काय पाहिजे ते मी पाहणार आहे. लोकांनी मला निवडून आणले आहे. आमदार होऊन आठ महिन्यात लॉकडाऊन झाले आहे. विकास रात्र दिवस करू शकत नाही. मी यावेळी काय करायला पाहिजे ते करणार. तिकिट कुणाला द्यावी नको ते पक्ष पाहून घेणार मला लोबो बद्दल काही बोलायचे नाही. मंत्री लोबो सर्व मतदारसंघात लुडबुड करीत असतो त्यांना म्हापशात निवडणूक लढवायची असल्यास लढवू द्या मला फरक पडत नाही. म्हापशाचे नागरिक आपल्यास ओळखतात. पक्षाने मायकल लोबोवर कारवाई करावी. अन्यथा पक्षाने त्याचे ऐकावे. लोबो कधीही कुठेही काहीही बोलतात कदाचित ते नवीन पार्टी करायला बघतात. कोविडच्या काळात मुख्यमंत्री योग्य ते करीत आहे. नाहक लोबोनी काही बोल नये. पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी. पक्षाआड बोलत असल्यास लोबोवर कारवाई करणे गरजेचे आहे. सुधीर कांदोळकर यांनी आपल्या कारकिर्दीत काय विकास केला ते प्रथम दाखवावे. नाहक आपल्या विरोधात बोलू नये असा इशाराही यावेळी जोशुआ डिसोझा यांनी दिला. यावेळी निरीक्षक तुषार लोटलीकर उपस्थित होते.