लुधियाना येथे राजस्व विभागात (रेव्हेन्यू डिपार्टमेंट) आयुक्त असणाऱया तान्या बैस यांनी सर्वाधिक अटक कारवाया करण्याचा विक्रम नुकताच नोंदविला आहे. या अटक कारवाया त्यांनी वस्तुसेवा कर कायद्यांतर्गत (जीएसटी) केल्या आहेत. या कारवाया करून त्यांनी विक्रमी जीएसटी मिळवून दिला आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला आहे.
बनावट फर्म्स किंवा कंपन्या बनवून जीएसटी चुकविण्याचे नवे तंत्र अनेक बडय़ा उद्योजकांनी अवलंबिले आहे. ही बाब लक्षात येताच बैस यांनी आपल्या अधिकारांचा कठोरपणे उपयोग करून अशा बनावट कंपन्यांचे खरे मालक शोधून काढले. कोणाच्या दबावाखाली न येता आणि धमक्मयांना न घाबरता त्यांनी या धनदांडग्यांविरोधात अटकेचा बडगा उगारला. अवघ्या एका वर्षात त्यांनी 18 बनावट कंपन्यांची प्रकरणे बाहेर काढली. तसेच 192 कोटी रुपयांची जीएसटी चुकवेगिरी पकडून दिली. यापैकी दोन महिन्यात 33 कोटी रुपये वसूल करण्यात आले असून हा एका अधिकाऱयाचा विक्रमच असल्याचे बोलले जाते.
त्यांनी पहिली कारवाई 2016 मध्ये मंडी गोविंदगड येथील बनावट पोलाद व्यापार कंपनीवर केली होती. ही कंपनी बनावट पावत्या तयार करून जीएसटी चुकविण्यामध्ये साहाय्यभूत ठरत होती. त्यानंतर त्यांना लुधियानाचे प्रमुख आयुक्त आशुतोष बरनवाल यांनी लुधियानात बोलावून घेतले. तेव्हापासून त्यांचा दबंग या शहर आणि आसपासच्या भागात सुरू आहे.