वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा माजी कसोटीवीर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा फलंदाज सचिन तेंडुलकर याला कोरोनाची बाधा झाली असून तो आपल्या घरीच होम क्वारंटाईनमध्ये आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, विंडीजचे माजी कर्णधार सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी सचिनला या व्याधीतून लवकर तंदुरुस्त होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
रिचर्ड्स यांनी आपल्या ट्विटरवर शनिवारी सचिन कोरोना समस्येतून पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. क्रिकेट क्षेत्रातील अनेक चाहत्यांनी सचिन या व्याधीतून लवकर बरा होण्यासाठी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनला या व्याधीपासून स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला सर रिचर्ड्स यांनी दिला आहे.