वेंगुर्ले/वार्ताहर-
डॉ. बाळसाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी महाराष्ट्र राज्यातून मुंबई वाशी मार्केटला 5 डझनी हापूस आंबा पेटय़ा 2018, 2019 व 2021 यावर्षीच्या हंगामात सर्वात प्रथम म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी पाठविणारे मालवण कुंभारमाठचे बागायतदार उत्तम सुर्यकांत फोंडेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व हापूस आंब्याचे कलम देवून सत्कार केला.
हवामान बदलातील वातावरणामुळे आंबा व काजू बागायतीवर झालेल्या परीणामावर चर्चा व उपाय योजना संदर्भात कोकण दौऱ्यावर आलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात 2018, 2019 व 2021 या तिन्ही वर्षाच्या आंबा हंगामात कोकणातून मुंबई वाशी मार्केटला 5 डझनी हापूस आंब्याच्या पेटय़ा सर्व प्रथम पाठविणारे मालवण कुंभारमाठ येथील बागायतदार उत्तम सुर्यकांत फोंडेकर यांचा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. यावेळी कोकण कृषि विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी. एन. सावंत, किटक विकृती शास्त्रज्ञ मोहन दळवी, आंबा उद्यानवेत्ता डॉ. एम. एस. गवाणकर, डॉ. सौ. इंदू सावंत यांचेसह अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.