पृथ्वीच नव्हती मग हा दगड आला कुठून?
आफ्रिकेतील सहारा वाळवंटात पृथ्वीच्या वयापेक्षाही अधिक जुन्या दगडाचा (उल्कापिंड) शोध वैज्ञानिकांनी लावला आहे. या दगडाचे वय सुमारे 4.5 अब्ज वर्षांपेक्षाही अधिक आहे. हा दगड प्रत्यक्षात एका उल्कापिंडाचा हिस्सा असून अंतराळात फिरत असताना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खेचला गेला आहे. हा उल्कापिंड पृथ्वी अस्तित्वात येण्यापूर्वीही अस्तित्वात होता. हा दगड पृथ्वीवर कधी कोसळला हे अद्याप समजलेले नाही.
सर्वात जुना दगड
संशोधकांनी या उल्कापिंडाला ईआरजी चेच 002 आणि ईसी 002 नाव दिले आहे. हा तुकडा एखाद्या पुरातन ग्रहाच्या मूळ हिस्स्यातील असल्याचे सांगण्यात आले. अशा दगडांना बिल्डिंग ब्लॉकच्या स्वरुपात ओळखण्यात येते. हा आतापर्यंतचा शोधण्यात आलेला सर्वात जुना दगड असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. हा दगड
अल्जीरियाच्या समुद्रात लागला शोध
या दगडाचा शोध अल्जीरियाच्या एर्ग चेच डय़ून समुद्रात लावण्यात आला होता. याचमुळे या दगडला ईआरजी चेस नाव देण्यात आले आहे. यात प्रत्यात अनेक उल्कापिंड सामील असून त्यांचे एकूण वजन सुमारे 31 किलोग्रमॅच्या आसपास आहे.
अब्जावधी वर्षांपूर्वी निर्मिती
अध्ययनानुसार मॅग्निशियम आणि ऍल्युमिनियम आयसोटोपच्या तपासणीतून हा दगड सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी ठोस स्वरुपात रुपांतरित झाल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी एनडब्ल्यूए 11119 नावाच्या एका आग्नेय उल्कापिंडाला शोधण्यात आले होते, हा ईआरजी चेच 002 च्या वयापेक्षा सुमारे 12 लाख वर्षांनी लहान आहे. हे दगड अस्तित्वाच्या आल्याच्या लाखो वर्षांनी पृथ्वीची निर्मिती झाल्याचे सांगण्यात येते.
प्रेंच संशोधकांचे पथक
या अध्ययनाचे नेतृत्व फ्रान्सच्या युनिवर्सिटी ऑफ वेस्टर्न ब्रिटनीचे भूरसायनशास्त्राचे प्राध्यापक जीन-एलिक्स बाराट यांनी केले आहे. ईसी 002 सर्व लघुग्रह समुहांपेक्षा स्पष्टपणे वेगळा आहे. ईसी 002 च्या समान गुणधर्म असलेली कुठलीच वस्तू आतापर्यंत शोधण्यात आलेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.