अमिताभच्या ‘चेहरे’चा टीजर प्रदर्शित
अमिताभ बच्चन यांच्या चेहरे चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे रुमी जाफरी यांनी दिग्दर्शन केले आहे. ‘इस दुनिया में कोई भी बंदा ऐसा नहीं है जिसने अपने जिंदगी में कोई अपराध नहीं किया हो’ या डायलॉगसह टीजरची सुरुवात होते. तर अमिताभ यांच्या तोंडून ‘हमारी अदालतों में जस्टिस नहीं जजमेंट होता है. इंसाफ नहीं फैसला होता है’ हे वाक्य त्यांच्या विशेष स्टाईलमधून ऐकून येते. या टीजरमध्ये अमिताभ आणि इम्रान यांचा लुकही दिसून येतो. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री क्रिस्टर डिसुझा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
हा चित्रपट 9 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अनू कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात पूर्वी रिया चक्रवर्तीला सामील करण्यात आले होते. पण कुठल्याच पोस्टरमध्ये तिला दर्शविण्यात आलेले नाही.