सांखळी/प्रतिनिधी
राज्यात यंदा गणेशोत्सव कमी प्रमाणात साजरा करण्यात आला, तरी अनेकांनी बाजाराकडे पाठ फिरवलेली दिसली कोरोना महामारी ची भीती अनेकांच्या चेहऱयावर स्पष्ट दिसत होती दीड दिवस ,पाच दिवस,गणपती विसर्जन ही साद्या पद्धतीने करण्यात आले सरकारी नियमांचे पालन केले तरीही सांखळी मतदारसंघात आज 21 कोरोनाचे रूग्ण सापडल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण दिसत आहे सांखळी आरोग्य केंद्र डॉक्टर आणि सरकारी आरोग्य कर्मचारी मामलेदार प्रवीणजय पंडित विशेष काळजी घेताना दिसत आहे नागरिकांना या रोग विषयी माहिती देऊन भिऊन न जाता सरकारी नियमांचे पालन करा सुरक्षित राहा असे सांगण्यात येत आहे पांचायत मंडळे ही गावात चांगल्या प्रकारे देखरेख करत आहे स्थानिक आमदार मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावत यांनी नागरिकांनी भिऊन न जाता सुरक्षित राहून महामारी विरोधात लढा देण्यासाठी सहकार्य करावे तसेच स्वतः पासून दुसऱयाला कोरोना होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी असे जागृत लोकांचे म्हणणे आहेसांखळी मतदारसंघात आज21 कोरोना रूग्ण सापडले,,तीन ठीक होऊन घरी परतले 162 रुग्ण एकटीव्ह आहेत अशी माहिती मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी दिलीङवेळगे पंचयात क्षेत्रात मास्कचे वाटपङ आज सकाळी वेळगे पंचयात मंडळ तऱ्फे कोरोनाचे वाढते संकट लक्ष्यात घेता गावात तीन हजार मास्क चे वाटप करण्यात आले एका स्थानिक खाण कंपनीने सामाजिक जबाबदारी म्हणून यासाठी सहकार्य केले। या वेळी सरपंच गोविंद गावकर, उपसरपंच उन्नती सहस्त्रबुद्धे,पंच महेश गवंडे कंपनी प्रतिनिधी आसावरी कुलकर्णी, अँड दीपेश गावस, सुरेश बायेकर यांची उपस्थिती होती।