आज मंगळवारी चिखलकला
सांखळी/प्रतिनिधी
आज सोमवारी गोकुळ अष्टमी निमित्त सांखळी शहरातील राधा कृष्ण मुरलीधर संस्थानच्या मंदिरात सकाळ पासून भाविकांची दर्शनासाठी ये जा सुरू होती स्थनिक आमदार मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी श्री राधकृष्ण देवाचे दर्शन घेतले. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष अनिल काणेकर खजिंदार प्रियेश डांगी,संदीप काणेकर,निशिकांत मेरकर,प्रेतिक नार्वेकर उपस्थित होते.
आज मंगळवारी चिखल कला सांखळी शहरातील राधाकृष्ण मुरलीधर मंदिरात आज 31 रोजी दुपारी चिखलकाला कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे तदनंतर आरती व तीर्थ प्रसाद होईल ,कोरोना महामारी मुळे यंदा सरकारी नियमानुसार मर्यादित स्वरूपात हा कार्यक्रम साजरा करण्यात येईल असे देवस्थान तर्फे कळवण्यात आले आहे